सावंतवाडी / प्रतिनिधी
Moti Lake or Vanrai Lake?
तलावातील वाढलेल्या झाडांमुळे तलावाचे सौंदर्य धोक्यात
सावंतवाडी म्हटली की पाण्याने भरलेला मोती तलाव आणि या मोती तलावाच्या परिसराचा भाग आणि सौंदर्य देखणे असे आहे. त्यामुळे देशी विदेशी पर्यटक आणि स्थानिक नागरिकही मोती तलावाकडे विसावतात. पण गेले काही महिने हा मोती तलाव आहे की आणि काय आहे असा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्याला पडत आहे. या मोती तलावात पाणीच पाणी पाहायला मिळते पण सध्या सर्वत्र वनराई उगवली आहे त्यामुळे झाडी झुडपी वाढलेला तलाव असे चित्र पाहायला मिळत आहे खरंतर या उन्हाळी हंगामात पर्यटकांची रीघ सावंतवाडी शहराकडे असते. त्यात मुंबई – पुणेकर चाकरमानी गावाकडे येतात आणि ते शहरात फिरायला येतात आणि त्यावेळी मोती तलाव आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो . यंदा मोतीतलावातील पाणी गायब झाले असून हिरवीगार वनराई पर्यटकांना खुणावते आहे. सावंतवाडी नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का ? खरंतर मोती तलावाच्या एका भागात एवढी वनराई वाढली आहे की मोती तलाव मध्ये जंगल व्याप्त भाग दिसत आहे .पालिका प्रशासनाने ही वाढलेली वनराई तोडणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात या तलावात पाणी भरल्यानंतर ही वाढलेली वनराई धोकादायक ठरू शकते तसेच सध्या या वाढलेल्या वनराईमुळे मोती तलाव की अन्य काय असे विचारले जात आहे.









