केनिया संघाकडे विजेतेपद : बेळगावच्या निखिल चिंडकची चमक

बेळगाव : पुणे- म्हाळुंगा झालेल्या सहाव्या विश्वचषक रोलबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत केनिया संघाने भारताचा 7-4 असा पराभव करीत विश्वविजेता ठरला. भारताल या स्पर्धेत उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. बेळगावचा निखिल चिंडकने उत्कृष्ट कामगिरी बजावली. पुणे बालेवाडी येथील श्री छत्रपती मैदानावर घेण्यात आलेल्या सहाव्या विश्वचषक रोलबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने सेनेगलचा 10-7 असा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात केनियाने लठविया संघाचा 14-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात केनियाने भारताचा 7-4 असा पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. केनियातर्फे ग्रीफिसने 3 गोल, बोनेस्पेसने 2, मोजेस व बियानल यानी प्रत्येकी 1 गोल केला. भारतातर्फे सचिन सैनीनेटने 2, आदीत्य सुतार व आकाश गणेशवाडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेनेगेलने लटव्हियाचा 8-5 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला. बक्षिस वितरणप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, धिरज दाटे, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत काकडे, आशिया रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष एस. एस. रॉय, मनोहर कांत, मनोज यादव, चेतन भांडवलकर, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष राजु दाबाडे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केनिया उप विजेत्या भारतीय संघाला प्रमाणपत्र, चषक व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. 6 व्या विश्वचषक रोलबॉल स्पर्धेत भारतीय संघात बेळगावचा निखिल रमेश चिंडक, भारतीय संघात समावेश होता. त्यांनी या स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. य् ाा संघात आकाश गणेशवाडे, हर्षल दुगे, आदीत्य सुतार, हरीजय केरकेरी, मीहिर मासाने सर्व महाराष्ट्र सचिन सैन उत्तरप्रदेश, विकीसैनी राजस्थान, निखिल चिंडक कर्नाटक बेळगाव, गुरूचरणसिंग मध्यप्रदेश, करन सिंधानीया दिल्ली, प्रदिप टी. केरळ, श्रीकांत साहु झारखंड तर सुहास डोपे महाराष्ट्र व अनुराग बासपोट आसाम, अभिमन्यू केरळ यांचा या खेळात समावेश आहे.









