वृत्तसंस्था/ हैदराबाद
कोलकाता नाईट रायडर्स संघातील अष्टपैलू खेळाडू विंडीजच्या आंद्रे रसलने टी-20 या प्रकारात 600 षटकार नोंदविण्याचा पराक्रम केला आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रसेलने हा विक्रम नोंदविला.
या सामन्यात रसेलने 15 चेंडूत 24 धावा जमविताना दोन उत्तुंग षटकार खेचले. व्र्रिकेटच्या टी-20 प्रकारात सर्वाधिक षटकार नोंदविणाऱ्या फलंदाजांच्या यादित आता आंद्रे रसेल तिसऱ्या स्थानावर आहे. विंडीजच्या गेलने 1056 षटकारांसह पहिले तर विंडीजच्या किरॉन पोलार्डने 812 षटकार नोंदवित दुसरे तर आंद्रे रसेल तिसऱ्या स्थानावर आहे. रसेलने न्यूझीलंडच्या ब्रेनडॉन मेकॉलमला मागे टाकले आहे. मेकॉलमने टी-20 प्रकारात 485 षटकार तर न्यूझीलंडच्या मुनेरोने 480 षटकार झळकविले आहेत.









