सेन्सेक्स 695 अंकांनी नुकसानीत : निफ्टीचा प्रवासही प्रभावीत होत बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील अंतिम सत्रात शुक्रवारी आर्थिक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील समभाग विक्रीच्या परिणामुळे बीएसई सेन्सेक्स तब्बल 695 अंकांनी कोसळला आहे. याच्या विरुद्ध बाजूला एनएसई निफ्टी 187 अंकांच्या नुकसानी सोबत बंद झाला आहे. यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक यांनी व्याजदर वाढीच्या गुरुवारी घेतलेल्या निर्णयाचा फटका हा भारतीय बाजाराला मोठ्या प्रमाणात बसल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर 694.96 अंकांनी प्रभवीत होत निर्देशांक 1.13 टक्क्यांसोबत 61,054.29 वर बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 186.80 अंकांनी घसरुन निर्देशांक 18,069.00 वर बंद झाला आहे.
जागतिक पातळीवरील स्थिती पाहिल्यास यात फेडरल रिझर्व्ह बँकेचे समभाग हे जवळपास 8 टक्क्यांनी कोसळले आहेत. बीएसई सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग हे 5.80 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी 5.57 , इंडसइंड बँक 4.57 टक्क्यांनी सर्वाधिक नुकसानीच्या प्रवासात राहिले होते. यासह टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक आणि इन्फोसिस यांचे समभाग हे 1 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहे. अन्य कंपन्यांमध्ये टायटनचे समभाग 2.46 टक्क्यांनी वधारुन बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, आयटीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग वधारुन बंद झाल्याचे दिसून आले.
आगामी प्रवासाकडे नजरा…………
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयानंतर आता त्याचा परिणाम हा जगभरातील प्रमुख बँकांवर होणार असल्याचे सेकेत व्यक्त केले जात आहेत. परंतु यावर आता आर्थिक क्षेत्रातील घटकांवर कोणता परिणाम होणार व देशातील आरबीआय बँक पुढे कोणता निर्णय घेणार हे पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यासर्व घटनांवरच भारतीय शेअर बाजाराचा आगामी प्रवास निश्चित होणार असल्याची दाट शक्यता आहे.









