नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पने इलेक्ट्रिक स्कूटर विदा या गाडीची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये एंट्री लेव्हल विदा व्ही 1 प्लस आता जवळपास 25,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर टॉप ऑफ द लाइन विदा व्ही1 प्रोची किंमत ही 19,000 रुपयांनी कमी झाली असल्याची माहिती आहे. हिरोने 7 ऑक्टोबर 2022 रोजी विदा इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन प्रकारांमध्ये सादरीकरण केले आहे. लाँचिंगच्या दरम्यान व्ही प्लसची किंमत 1.45 लाख रुपये तर व्हि1 प्रो ची किंमत ही 1.50 लाख रुपये निश्चित केली होती.
हिरोने का कमी केली ई-स्कूटरची किंमत
अवजड उद्योग मंत्रालयाकडून नोटीस मिळाल्यानंतर कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी केली आहे. खरंतर इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी सरकारकडून फेम 2 सबसिडी मिळवण्यासाठी त्यांच्या ई स्कूटरवर किंमती कमी ठेवल्या परंतु चार्जर आणि सॉफ्टवेअरच्या नावावर ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारले जात होते. याची दखल शासनाने घेतल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.









