बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असिफ ( राजू ) सेठ यांना उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे .
गुरुवार दि. ०४ रोजी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असिफ ( राजू ) सेठ यांनी शहरातील कॅम्प परिसरात आपला प्रचार केला. घरोघरी जाऊन त्यांनी वोट अपील केले. यावेळी जय दुर्गा युवक मंडळाची भेट घेतली. तसेच येथे आयोजित संवाद कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या मागण्या आणि समस्या उमेदवार राजू सेठ यांच्या निदर्शनास आणून दिले. मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी यंदाच्या निवडणुकीत आपणास संधी देण्याचे आवाहन केले.
परिसरातील कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट , झाडांची सुरक्षा, २४ तास पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन केले.
या वेळी त्यांचे बंधू माजी आमदार फिरोझ सेठ, गौस धारवाडकर, अल्लेद्दीन किल्लेदार, रिजवान बेपारी व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.










