सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
Anandashraya is the pilgrimage of social service! – Guardian Minister Ravindra Chavan
आनंदाश्रय वृद्धाश्रम हे खऱ्याअर्थाने समाजसेवेचे तीर्थक्षेत्र असून तेथील सेवाकार्य पाहून या ठिकाणी नेहमीच नतमस्तक व्हावेसे वाटते . असे उद्गार महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले . अणाव येथील आनंदाश्रय या वृद्धाश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी शुक्रवार सकाळी या आश्रमाला भेट देत येथील निराधार वृद्धांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले . यावेळी आनंदाश्रयचे संस्थापक बबनकाका परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी बबनकाका परब यांच्याशी चर्चा करून आश्रमाला भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नाची माहिती करून घेतली . व तात्काळ अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या . या भेटी प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली , युवा मोर्चा अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत , जि . प . माजी उपाध्यक्ष रणजित देसाई , कुडाळ तहसीलदार अमोल पाठक आदी मान्यवर उपस्थित होते .