ओटवणे / प्रतिनिधी
The first rally of the Kolgaon Village Board (Mumbai) is in excitement
चाकरमान्यांसह कोलगाव वासियांचीही लक्षणीय उपस्थिती
कोलगांव येथील मुंबईस्थित ग्रामस्थांच्या श्री सातेरी कोलगांव ग्रामस्थ मंडळाचा पहिला वार्षिक मेळावा मुंबईतील काळाचौकी येथील अभ्युदय एज्युकेशन सोसायटीच्या बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला मुंबईस्थित कोलगावातील चाकरमान्यांसह कोलगाववासियानीही लक्षणीय उपस्थिती दर्शविली होती.
या मेळाव्याच्या व्यासपिठावर कोलगावातील अनिल धुरी, चंदन धुरी, राजन म्हापसेकर, मेघश्याम काजरेकर, नंदा धुरी, सदाशिव धुरी, आनंद धुरी, कोलगावा मुंबई मंडळाचे अध्यक्ष विलास धुरी, उपाध्यक्ष शिवाजी धुरी, सचिव सचिन धुरी, मंगेश धुरी, शशिकांत ठाकूर, गुरुनाथ परब, दत्तात्रय साईल, सचिन धुरी, एकनाथ साईल, विजय म्हापसेकर, विश्वनाथ म्हापसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चंदन धुरी यांनी सातेरी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात पूर्णत्वासाठी ५० लाखाची आवश्यकता आहे. कोलगावातील चाकरमान्यांचे यासाठी सहकार्य लाभले असुन अजूनही मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले. मेघश्याम काजरेकर यांनी एकजुटीचे महत्त्व पटवून देत कोलगांव ग्रामस्थ मंडळाने यापुढेही एकजुट कायम ठेवावी असे आवाहन केले. यावेळी मंडळाच्यावतीने विलास धुरी या मेळाव्याला मोठया संख्येने आलेल्या कोलगांववासीयांचे ॠण व्यक्त करीत यापुढेही सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सचिन धुरी यांनी मंडळाच्या गेल्या तीन वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. शिवाजी धुरी यांनी मुंबईत आपल्या गावचे मंडळ असण्याचे महत्त्व विषद केले.









