दोन लाख किमतीचे मोबाईल मूळ मालकास पर
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील गेल्या चार महिन्यात मोबाईल गहाळ व हरवल्याच्या तक्रारी जत पोलिसात दाखल झाल्या होत्या. या तक्रारीस अनुसरून जत पोलिसांनी सायबरची मदत घेत व तांत्रिक बाबी तपासात १२ जणांच्या मोबाईलचा शोधण्यात यश आले आहे. नुकतेच मूळ मालकांची व मालकीबाबत व खरेदी पावत्याची पडताळणी करण्यात आली. सदरचे १२ मोबाईल पाऊणे दोन लाख किंमतीचे होते. हरवलेले मोबाईलाचा शोध घेऊन मूळ मालकांना परत केले असल्याची माहिती जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली.
जत तालुक्यातील मोबाईल गहाळ व हरवणलयाच्या तक्रारीत वाढ झाली आहे.पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने शोध घेत १२ जणाच्या मोबाईलचा शोध घेण्यात आले आहेत.( कंसात किंमत) मुबारक इस्माईल नदाफ (रा. काराजंगी) (१७ हजार ),योगेश्री कुंभार रा.जत (१८०००), शीतल चव्हाण रा.कवठेमंहकाळ(११ हजार), अनिल बापू शिरगिरे रा. वाशन (१६ हजार), संतोष शिवपुंजी रा. बिळूर,(१७ हजार) रेवप्पा पुजारी रा. सोरडी (१३ हजार), शंकर मारुती कोडग रां. निगडी खुर्द (१३ हजार) प्रकाश गडदे रा. बाज (१३ हजार) सागर शिवाजी कोळी ( १४ हजार ) ,किसन दत्तात्रय हजारे रा. खलाटी(१३ हजार ) प्रेम रवींद्र कोळी रा. जत (१४ हजार) दिलीप तुकाराम बंडगर रा. मल्याळ (१६ हजार) या सर्व जणाचे मोबाईल हरवले होते सदरच्या नोंदी जत पोलिसात होत्या. मोबाईलच्या आयएमईआय नंबर वरून तांत्रिक तपासणी करत असताना सदरचे मोबाईल संबंधित व्यक्तीकडून जत पोलिसांना कडे जमा करून घेतले होते. व मूळ मालकाकडे मोबाईल होईल परत केले आहेत.परत केलेल्या एकूण १२ मोबाईल ची पावणेदोन लाख रुपये किंमत होते. यामुळे मूळ मालकांना दिलासा मिळाला आहे त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.








