सावंतवाडी / प्रतिनिधी
Talkat Dist. School Talkat No. 1st Centenary Celebration on 5th May!
दोडामार्ग तालुक्यातील तळकट जिल्हा.परीषद पूर्ण प्राथमिक शाळा तळकट नं. १ चाशतक महोत्सव सोहळा 5 ,6,7 मे रोजी होणार आहे. शतक महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन 5 मे रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे तर सात मे रोजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शतक महोत्सव सांगता समारोप होणार आहे .5 ,6,7 मे असे तीन दिवस कार्यक्रम चालणार आहेत
कार्यक्रमाची रूपरेषा अशी-
५ मे -उद्घाटन दिपक केसरकर (शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य)
दुपारी ३.०० वा. • स्मरणिका प्रकाशन आणि माजी शिक्षक सत्कार सोहळा, रात्रौ १० वा. माजी विद्यार्थी विविध कार्यक्रम
६ मे -प्रमुख पाहुणे रविंद्र चव्हाण (पालकमंत्री, सिंधुदुर्ग)
स. १०.०० वा. रक्तदान शिबीर
दु. ३.०० वा. व्याख्यान डॉ. रुपेश पाटकर (मानसोपचार तज्ञ, बांदा), डॉ. श्री. अनिकेत गवस (सहा.अभि श्रेणी २)) रात्रौ १०.०० वा. ग्रामसेवा मंडळ तळकट कट्टा, मुंबई यांचा सामाजिक नाट्यप्रयोग-माझ्या मना
. ७ मे – प्रमुख पाहुणे विनायक राऊत (खासदार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
दु. ३.०० वा. व्याख्यान डॉ. प्रसाद देवधर, कुडाळ (प्रगत बागायती शेती) -मिळुनी साऱ्या जणी (महिला तळकट कट्टा), रात्रौ १०.०० वा. माजी विद्यार्थीनी शाळा तळकट नं.१ यांचा दशावतार नाट्यप्रयोग-विष्णुमहिमा ८ मे
रात्रौ १०.३० वा. रंजनकला नाट्यमंडळ तळकट कट्टा यांचा सामाजिक नाट्यप्रयोग-सासरच्या अंगणी यावेळी आजी-माजी विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ तसेच नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शतक महोत्सव समिती ,
ग्रामस्थ तळकट कट्टा आणि ग्रामसेवा मंडळ तळकट कट्टा मुंबई यानी केले आहे.









