सावंतवाडी / प्रतिनिधी
Sharad Pawar should remain as President – Praveen Bhosale
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा घेतलेला अपेक्षित आणि धक्का देणारा होता .मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची मोट बांधण्याची कसब केवळ शरद पवार याच्याकडेच आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पक्षाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये अशी विनंती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. लोक माझा सांगाती या शरद पवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मुंबईत झाले .या कार्यक्रमाला भोसले उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आपण पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांचा हा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक होता. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यानी अध्यक्षपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ते पक्षाचे मार्गदर्शक म्हणून कायम राहणार आहेत. राज्यसभेचे खासदार म्हणून तीन वर्षे ते काम करणार आहेत. त्याशिवाय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे .पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा जो निर्णय घेतला तो मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाची मोट केवळ शरद पवाराच बांधू शकतात तेवढी कसब त्यांच्यात आहेत .त्यामुळे त्यांनी सध्या राजीनामा देऊ नये अशी आमची इच्छा आहे. ति ते मान्य करतील असा विश्वासही भोसले यांनी व्यक्त केला आहे .अजित पवार ,सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व सक्षम आहे .ते पक्ष पुढे चालू शकतात परंतु सध्याच्या घडीला शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहावे अशी आमची इच्छा असल्याचे भोसले म्हणाले.









