Supriya Sule News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी घोषणा केली. यानंतर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा असा आग्रह धरत दिवसभर ठाण मांडून बसले होते. दरम्यान, निर्णयाबाबत फेरविचार करण्यासाठी शरद पवार यांनी 2 ते 3 दिवसाचा अवधी मागितला. मात्र पवार राजीनामा देणार यावर ठाम आहेत. यामुळे महाराष्ट्रात सध्या तणावाचे वातावरण आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलं आहे. पवार यांच्या राजीनाम्या नंतर 5 नावांची जोरदार चर्चा सुरु आहे.यात सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, आणि सुनील तटकरे यांचीही नावे चर्चेत आहेत. गेल्या एका तासापासून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे.या बैठकित सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी बोलताना भविष्यातील राजकारणाचे मोठे संकेत दिले आहे.राज्याचे नेतृत्व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे असेल तर देशाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल अस मत छगन भूजबळ यांनी आज व्यक्त केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शरद पवार ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीत. शिवसेनेनंतर शरद पवार यांचा आम्ही हात धरला. त्यानंतर आम्हाला अनेक फायदे झाले.आरक्षण मिळाले,मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळाले.फुले-शाहू-आंबेडकर यांचा आदर्श घेऊन पुढे जाणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार आहे. शरद पवार यांना आम्ही सगळे जण पुन्हा पुन्हा समजविण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.शरद पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही असा सवाल कालपासून आव्हाड करत आहेत.याचबरोबर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील आप-आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.त्यामुळे शरद पवार कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








