मुंबई:
वित्त क्षेत्रात कार्यरत कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा फायनॅन्शीयल सर्व्हिसेसचे समभाग मंगळवारी 7 टक्के इतके शेअरबाजारात वाढले आहेत. 52 आठवड्याच्या उच्चांकावर कंपनीचा समभाग पोहचला होता. मंगळवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 7 टक्के वाढत 277 रुपयांवर पोहचला होता. कंपनीने वर्षाच्या स्तरावर 14 टक्के वाढीसह 684 कोटी रुपयांचा निव्वळ नफा पदरात पाडून घेतला आहे.









