आयपीएल स्पर्धेतील लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बीसीसीआयने विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक यांच्यावर कठोर कारवाईची पावले उचलली आहेत. सामन्याच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल विराट कोहली, गौतम गंभीर यांना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या 100% दंड ठोठावण्यात आला. तर नवीन-उल-हकला त्याच्या मॅच फीच्या 50% मानदन कापले जाणार आहे.या तिघांनीही आपापल्या गुन्ह्यांची कबुली देऊन दंड बीसीसीआयकडून दंड स्वीकारला.
आयपीएलने घोषित केल्याप्रमाणे “लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर गौतम गंभीरला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या सामन्याच्या फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. गंभीरने कलम 2.21 अंतर्गत गुन्ह्याची कबुली दिली आहे.”
आपल्या प्रसिध्दी पत्रकात बीसीसीआयने “रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा फलंदाज विराट कोहलीला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला असून कोहलीने कलम 2.21 अंतर्गत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.” म्हटले आहे.
आयपीएल सीझनच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरसीबीला हरवल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरच्या सेलिब्रेशनला हा थेट आव्हान देताना आरसीबीचा खेऴाडू विराट कोहली मोठ्याने किंचाळताना, मुठ्या आवळताना आणि गर्दीला शांत न बसण्याचे आवाहन करता होता. बंगळूरमध्ये झालेल्या मॅचनंतर गौतम गंभिरने अशाच प्रकारचे आव्हान करताना तोंडावर बोट ठेवले होते.
लखनऊ सुपर जायंट्सच्या धावसंख्येचा पाठलाग करताना 17 व्या षटकात कोहलीने लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक यांच्याशी जोरदार बाचाबाची केली. सामना संपल्यानाही वातावरण काही तणावात्मक होते. सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही बाजूंचे खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी रांगेत उभे राहीले त्यावेळी कोहलीने नवीनशी हुज्जत घातली. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नविन याच्या आक्रमक भुमिकेनंतर कोहलीचा सूर नरमताना दिसला.