स्टॅफोर्डशायरमधील शवागाराचा होणार कायापालट
ब्रिटनच्या स्टॅफोर्डशायरमध्ये अनेक वर्षांपासून निर्जन ठरलेल्या एका शवागाराचा आता कायापालट होणार आहे. या शवागाराला हॉटेलमध्ये बदलले जात आहे. ज्या ठिकाणी सध्या दिवसाच्या वेळीही जाण्यास भीती वाटते, तेथे आता पाटर्य़ा होणार असून लोक मौजमस्ती करताना दिसून येतील.
या शवागाराला एअरबीएनबीच्या प्रॉपर्टीत रुपांतरित करण्यात येईल. या हॉटेलच ाr थीम देखील भूताशी संबंधित ठेवली जाणार आहे. या मालमत्तेच्या ऑनलाइन लिलावासाठी बोली लागल्या आहेत. याची प्रारंभिक किंमत 56 लाख रुपये इतकी होती. परंतु याला दुप्पट किंमत मिळाली आहे. या शवागाराचा इतिहास अत्यंत जुना आहे.

या जुन्या शवागाराला जॉन पे ऑक्शन्सने विक्रीसाठी उपलब्ध केले होते. या शवागाराला दीड कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. अनेक वर्षांपूर्वी तेथे मृतदेहांचे जतन केले जात होते. परंतु आता मागील 20 वर्षांपासून ही जागा वापराविना होती. अलिकडेच याचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले होते. याच्या परिसरात उगवलेली झुडुप आता हटविण्यात येणार आहे. शवागाराच्या खरेदीदाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
हे शवागार एका चर्चच्या नजीक आहे. पूर्वी येथे मृतदेह आणल्यावर प्रार्थना केली जात होती. परंतु मागली 20 वर्षांपासून बंद पडलेल्या या शवागाराची स्थिती आता खराब झाली आहे. याच्या छतासह इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या शवागाराच्या ठिकाणी तयार होणाऱया हॉटेलमध्ये राहण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतील असे उद्गार ऑक्शनियर हेलेन यांनी काढले आहेत.









