वार्ताहर /नंदगड
भारतीय जनता पक्षाच्या नंदगड विभागीय प्रचारकार्यालयाचे उद्घाटन भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरविंद पाटील होते. य् ाावेळी व्यासपीठावर संजय कुबल, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, प्रमोद कोचेरी, सयाजी पाटील, मल्लाप्पा मारीहाळ, विजय कामत, यल्लाप्पा मुतगेकर, शंकर बस्तवाडकर, यल्लाप्पा तिरवीर, लक्ष्मण बेटेकर आदी उपस्थित होते. विजय कामत बोलताना म्हणाले, कर्नाटक विधानसभेची ही निवडणूक मठाचे धर्म व हिंदुत्व या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. त्यासाठी मतदान व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे. यापूर्वी पेज प्रमुख, शक्ती केंद्र, महाशक्ती केंद्र अशा विविध समित्या करण्यात आल्या आहेत. सर्वांनी जबाबदारीने काम केल्यास भाजपचा विजयी निश्चित आहे. प्रमोद कोचेरी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीतून विविध समाजोपयोगी योजना लोकप्रिय ठरत आहेत. शारीरिक तंदुरुस्तीसाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी तसेच सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजना मंजूर केली आहे. त्याशिवाय किसान सन्मान योजना, विद्यार्थी विकास निधी अशा विविध योजनांचा समावेश आहे. भाजप पक्ष सर्वांचा कल्याणकारी पक्ष आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मी भाजपचे प्रामाणिकपणे काम करते. आपणही कोण आले गेले याचा विचार न करता भाजपासाठी काम करा, असे आवाहन धनश्री सरदेसाई यांनी केले. माजी आमदार अरविंद पाटील यांनी भाजपाच्या कमळाला मतदान करा, असे आवाहन केले. यावेळी जोतिबा रेमाणी, मल्ल्लाप्पा मारीहाळ आदीनी आपले विचार मांडले. कार्यकर्ते बलराम गुरव, महाबळेश्वर पाटील, प्रदीप पवार, प्रमोद पाटील, राजू पेडणेकर, यल्लाप्पा गुरव, प्रशांत लक्केबैलकर, विजय पाटील आदीसह नंदगड परिसरातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी विठ्ठल हलगेकर यांना निवडून आणण्याचा ठाम निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.









