वृत्तसंस्था/ माद्रिद (स्पेन)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या पावोला बेडोसा तसेच रशियाची नवोदित 16 वर्षीय मीरा अँड्रिव्हा यांनी एकेरीची चौथी फेरी गाठली आहे मात्र अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात बेडोसाने गॉफचा 6-3, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये 71 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत चौथी फेरी गाठली. बेडोसाचा चौथ्या फेरीतील सामना ग्रीसच्या मारिया सॅकेरीशी होणार आहे. सॅकेरीने तिसऱ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या रिबेका मॅसेरोव्हाचे आव्हान 3-6, 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. रशियाच्या नवोदित मीरा अँड्रिव्हाने मॅगेडा लिनेटीचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत चौथी फेरी गाठत आपला 16 वा वाढदिवस साजरा केला. बेलारुसच्या साबालेंकाने ओसोरिओवर 6-4, 7-5 अशी मात करत चौथी फेरी गाठली आहे.









