वृत्तसंस्था/ कोची
सोमवारी येथे होणाऱ्या पहिल्या कोची मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन ज्योती गवाते आणि अर्जुन प्रधान हे अनुक्रमे महिला पुरुषांच्या इलाईट विभागात प्रमुख आकर्षण राहतील.
कोची मॅरेथॉन स्पर्धेला येथील महाराजा कॉलेजच्या मैदानावरून प्रारंभ होणार आहे. ही मॅरेथॉन 42.195 किलो मीटर पल्ल्याची तर हाफ मॅरेथॉन 21.097 किलो मीटरची त्याचप्रमाणे 10 कि.मी. आणि 3 कि.मी. अशा चार विभागात ही मॅरेथॉन होणार आहे. विविध राज्यातील किमान सहा हजार धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. अलीकडेच नवी दिल्ली मॅरेथॉन जिंकणारी ज्योती गवाते तसेच पुरुषांच्या विभागात अर्जुन प्रधान यांच्या कामगिरीकडे लक्ष राहिल. ज्योती गवातेला या मॅरेथॉनमध्ये अश्विनी जाधव, अर्पिता सैनी यांच्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या इलाईट विभागात अर्जुन प्रधान, अनिल कुमार यादव, विपुलकुमार, नीरजकुमार मौर्य यांच्यात जेतेपदासाठी चुरस राहिल. या मॅरेथॉनमधील विविध गटातील विजेत्यांसाठी एकूण 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.









