हाय-डेफिनेशन रडार सॅटेलाइटच्या मदतीने पूर्ण पृथ्वीवर 19 हजारांहून अधिक सागरी ज्वालामुखींचा शोध लावण्यात आला आहे. आतापर्यंत आढळलेल्या सागरी पर्वतांची (सीमाउंट्स) सर्वात मोठी संख्या आहे. अलिकडेच अर्थ अँड स्पेस सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात ओशिन करंट, प्लेट टेक्टॉनिक्स आणि हवामान बदलाविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी सोनारचा वापर करून पृथ्वीच्या समुद्र तळावरील केवळ एक चतुर्थांश हिस्स्यालाच व्यापण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पाण्याखाली लपलेल्या गोष्टींचा शोध लावण्यासाठी साउंड वेव्ह्जचा वापर केला जातो. 2011 मध्ये जेव्हा सोनारचा वापर करण्यात आला होता, तेव्हा 24 हजारांहू अधिक सीमाउंट म्हणजेच सागरी पर्वतांचा शोध लावण्यात आला होता. हे पर्वत ज्वालामुखीय हालचालींमुळे तयार झाले हेते, परंतु 27 हजारांहून अधिक सीमाउंट्स सोनारला टिपता आले नव्हते.

या ज्वालामुखींमध्ये धोकादायक विस्फोट झाल्यास भूकंप, त्सुनामीसारखी आपत्ती येऊ शकते, मागील वर्षी टोंगा ज्वालामुखी विस्फोटामुळे आपत्ती निर्माण झाली होती अशी माहिती स्क्रिप्स इन्स्टीटय़ूशन ऑफ ओशनोग्राफीचे मरीन जियोफिजिसिस्ट डेव्हिड सँडवेल यांनी दिली आहे.
परंतु नव्या संशोधनातून समुद्राखाली काय घडतेय याच्या संशोधनासाठी वैज्ञानिकांना सोनार सर्व्हेवर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. रडार सॅटेलाइट समुद्राची खोली मोजण्यासाठी त्या खोलीत काय दडलंय हे देखील पाहू शकतात. समुद्रतळाच्या टोपोग्राफीला अधिक प्रभावीपणे पाहू शकतात. वैज्ञानिकांनी युरोपीय अंतराळ संस्थेच्या क्रायोसॅट-2 समवेत अनेक उपग्रहांद्वारे डाटा एकत्र करत पाण्याखाली 3609 फूटाइतक्या छोटय़ा टेकडय़ांचेही अध्ययन केले आहे.
या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सुमारे 1214 फुटांवरील छोटय़ा ज्वालामुखीय पर्वतांचाही शोध लावता येऊ शकतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. संशोधकांनी पूर्वोत्तर अटलांटिक महासागरात सीमाउंटेन्सच्या एका कलेक्शनचे मॅपिंग केले, ज्यातून आइसलँडमध्ये मेंटल प्लम तयार होण्यामागील कारणांचा शोध लावण्यास मदत होऊ शकते. या अद्ययावत केलेल्या मॅपमुळे ओशिन करंट आणि ‘अपवेलिंग’ला देखील चांगल्या प्रकारे समजून घेता येणार आहे. समुद्राच्या तळावरील पाणी पृष्ठभागाच्या दिशेने सरकू लागल्यावर अपवेलिंग घडत असते.









