रत्नागिरी प्रतिनिधी
राज ठाकरे यांची रत्नागिरीत ६ मे रोजी जाहिर सभा होतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी मनसे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सतिश नारकर यांनी केली. सभेसाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. न भूतो न भविष्यती अशी राज ठाकरे यांची जाहिर सभा होईल असा विश्वास रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सतिश नारकर यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रिडा संकुलात रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. सभेच्या आगोदर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत सतिश नारकर यांनी या ग्राऊंडची पहाणी केली. महावितरण पासून ते आरटीओ पर्यतच्या सर्व आवश्यक परवनाग्या घेण्यात आल्याची माहिती मनसे उपाध्यक्ष सतिश नारकर यांनी दिली