दिवसेंदिवस काँग्रेसला वाढत चाललेला पाठिंबा सत्ताधारी भाजप बघवत नाही. त्यामुळे निवडणुकीला दहा दिवस शिल्लक असताना माझ्यासह 50 उमेदवारांवर व त्यांच्या नातेवाईकांवर लोकायुक्त व आयकर विभागामार्फत छापे टाकले. हे भाजपचे षड़यंत्र असल्याचा आरोप बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.
रविवारी बेळगाव शहरात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कर्नाटक राज्यात यंदा काँग्रेसचा बोलबाला आहे. बेळगाव जिल्ह्यात देखील अनुकूल वातावरण आहे. जनता काँग्रेसच्या गॅरंटी योजनांसाठी वाट पाहत आहे. पण अशा परिस्थितीत भाजप नेत्यांनी वाट धरली आहे. केवळ निवडणुकीत त्रास देण्यासाठी हे प्रकार सुरु आहेत. निवडणुकीच्या अंतिम क्षणी भाजपने असले वाममार्ग न अवलंबता सत्य धर्म आणि न्यायाने निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान त्यांनी दिले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना लक्ष्मी बाळकड म्हणाल्या, छापेमारीशी आणि माझ्या विषयाशी काहीच संबंध नाही. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा एकमेव उद्देश यामागे आहे. त्यांनी काहीही करू द्या पण शेवटी मतदारच सर्व काही ठरवणार आहेत.
विधान परिषद सदस्य व लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी ,काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. निवडून आलेले आमदार मिळून निर्णय घेतात मग त्यानंतर पक्षश्रेष्ठी याविषयी निर्णय घेतील.









