बोरगाव बैठकीत एकमुखी निर्णय : विजयाच्या हॅट्रिकचा निर्धार
माणकापूर: बोरगाव येथील समस्त मुस्लिम समाजाचा भाजपा उमेदवार मंत्री शशिकला जोल्ले यांना पाठिंबा जाहिर करण्यात आला. येथील समस्त मुस्लिम कमिटी व समाजाच्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला. बैठकीत येत्या 10 मे रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाकडून निपाणी मतदारसंघातून मंत्री शशिकला जोल्ले रिंगणात आहेत. त्यांना निवडणुकीत एकमुखी पाठिंबा देत निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी इब्राहिम मोमीन म्हणाले, मुस्लीम समाजाच्या विकासासाठी मंत्री शशिकला जोल्ले यांनी कोटय़वधीचा निधी देऊन विकास केला आहे. यामध्ये शादिमहाल बांधकामासाठी 35 लाख, ईदगाह मैदान दुरुस्तीसाठी 25 लाख, कब्रस्थान संरक्षक भिंत बांधण्यासाठी 25 लाख, ईदगाह संरक्षक भिंत बांधकाम व गाळे निर्मितीसाठी 20 लाख तसेच ग्रामदैवत बाबा ढंगवली नगारखानासाठी 40 लाख असा निधी देऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. हि सर्व केलेली विकासकामे पाहून आम्ही मंत्री शशिकला जोल्ले यांना जाहिर पाठिंबा देत असल्याचे सांगितले. समाजाचे जेष्ठ नागरिक मुन्ना जमादार यांनीही आपले मनोगत व्यक्त करत मंत्री शशिकला जोल्ले यांच्या कार्याचा आढावा घेऊन आम्ही एकमुखी पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मुस्लीम कमिटी अध्यक्ष परवेज अफराज, उपाध्यक्ष बबन मुजावर, सेक्रेटरी आयुब मकानदार, मुन्ना जमादार, रेहमान जमादार, राजू मकानदार, रियाज मोमीन, सिराज मोमीन, पिंटू कापसे, अल्लू मुजावर, आबू फरास, इब्राहिम मोमीन, सलमान अफराज, शाहबाज अफराज, दादा नाईक, फिरोज अफराज, जमील अत्तार, अuताफ अफराज, साहेबलाल मोमीन, कयुब मोमीन, सद्दाम जमादार, सलीम. जमादार, हाजी मुस्सा मोमीन, अमीर अफरांज, अक्तर मुजावर, राजू नदाफ, शंमू अफराज, शब्बीर मुजावर, सद्दाम मकानदार, अस्लाम दुधगावे यांचासह इतिहादुल मुस्लिमन अरबी मदरसा (मक्तब) तसेच समस्त मुस्लिम कमिटीचे सर्व संचालक, सदस्य उपस्थित होते.









