रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचाराला वेग, विविध मंडळांनी जाहीर केला पाठिंबा
प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची शनिवारी भव्य अशी प्रचारफेरी काढण्यात आली. जुने बेळगाव, खासबाग नाका या परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. त्यानंतर वडगाव विभागात गाठीभेटी घेतल्या. यावेळी सर्वत्रच उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळाला.
वडगाव, आनंदनगर परिसरातून प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. रमाकांत कोंडुस्कर यांना शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. माजी नगरसेवक राजू बिर्जे, मनोहर होसुरकर, नितीन खन्नुकर, अनिल पाटील, अनिल अमरोळे, उमेश पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, श्रीधर पाटील, माजी नगरसेवक विजय भोसले, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, नगरसेवक रवी साळुंखे, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, भाग्यश्री पाटील, श्रेया पाटील, बंडू केरवाडकर, महेश जुवेकर, दत्ता उघाडे, ज्ञानेश्वर मण्णुरकर, बाबु नावगेकर, संतोष शिवणगेकर, पुंडलिक चव्हाण, शंकर चौगुले, सुभाष आपटेकर, महेश काकतकर, अमोल देसाई, उमेश पवार, दिलीप नाईक, मंगेश धामणेकर, नारायण दिवेकर, यल्लाप्पा कणबरकर, सुरेश रेडेकर, मोहन शिवणगेकर, सागर पाटील यांनी या प्रचारफेरीमध्ये भाग घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला.
आनंदनगर परिसरात भरघोस पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर वडगाव येथील विष्णू गल्ली, जुने बेळगाव, खासबाग या परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. कुलकर्णी गल्ली, गणेशपेठ, हरिजनवाडा, लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नुरकर गल्ली, कलमेश्वर मंदिर रोड व परिसर, धामणे रोड, मंगाईनगर, विष्णू गल्ली, वझे गल्ली, जुना राजवाडा कंपाऊंड, कारभार गल्ली, सोनार गल्ली, पिंपळकट्टा येथे पदयात्रेची सांगता झाली.
शिवजयंती उत्सव मंडळ व पंच मंडळ-विष्णू गल्ली, नरवीर युवक मंडळ, पंचमंडळ-कारभार गल्ली, शिवजयंती उत्सव मंडळ, गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक साप्ताहिक फंड-कारभार गल्ली या सर्वांनी पाठिंबा जाहीर केला. अमित कंग्राळकर, महेश पाटील, शशिकांत चव्हाण-पाटील, रमेश पाटील, श्रीकांत पाटील, रमाकांत बाळेकुंद्री, भैरु कंग्राळकर, सुभाष पाटील, अमर पाटील, लव पाटील, उदय पाटील, महादेव पाटील या सर्वांनी वडगाव परिसरामध्ये असलेल्या फलकांवर जाहीरपणे लिहून पाठिंबा दर्शविला आहे.
वझे गल्ली, राजवाडा कंपाऊंड, मंगाईनगर, पाटील गल्ली आणि त्यानंतर यरमाळ रोड येथे या प्रचारफेरीची सांगता झाली. यावेळी पंचमंडळी, युवक मंडळे, महिला मंडळे यांनी जाहीर पाठिंबा दिला.