आडी गावात प्रचार सभा; 20 हून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
निपाणी : निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांनी आडी गावात प्रचार सभा घेतली. यावेळी 20 हून अधिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी शशिकला जोल्ले यांनी मतदासंघात विकासकामांची ज्योत कायम तेवत ठेवायची असेsल तर भाजपला प्रंचड मतांनी विजयी करा, असे आवाहन केलं.
यावेळी भाजमध्ये प्रवेश केलेल्या सुचिता दुपाडाले, महंतेश दुपाडाले, रोहन दुपाडाले, राकेश दुपाडाले, सतीश दुपाडाले, संतोष तांबेकर, काशीनाथ पाटील, रवी मगदुम यांचे शशिकला जोल्ले यांनी स्वागत केले. यावेळी स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.









