सातारा प्रतिनिधी
मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. याठिकाणी शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी झाले असून महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. याठिकाणी शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि मकरंद पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून साताऱ्यात प्रथमच वेगळं राजकीय समीकरण पहायला मिळाल होते. याठिकाणी भाजप राष्ट्रवादी युतीतुन एकत्र आले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी गट, ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष आमदार गटाला टक्कर देत विरोधात निवडणूक लढत होते . भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे तिघे एकत्र निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दीपक पवार, ठाकरे सेनेचे सदाशिव सपकाळ, शिवसेना शिंदे गटाचे संदीप पवार त्यांच्या विरोधात एकत्र येऊन निवडणूक लढवत होते .अखेर दीपक पवार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते सदाशिव सपकाळ यांच्या गटाला हार पत्करावी लागली आहे.