ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. पण या निवडणुकीत ते विजयी झाले. राष्ट्रवादीला 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2 आणि काँग्रेसला 1 जागेवर यश मिळाले आहे.
राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. खेड बाजार समितीसाठी राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली. एकूण 3896 मतदारांपैकी 3839 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 10, तसेच व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.
या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी खेड तालुक्यातील 7 ठिकाणी 17 मतदान केंद्रावर मतदान पार पडलं होतं. निवडणूक चुरशीची असल्याने 98.54 टक्के मतदान झाले होते.








