बेळगाव : दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांचा रोड शो व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 30 रोजी त्याचे आयोजन करण्यात आले आहे. रमाकांत कोंडुस्कर यांच्या पदयात्रांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. आता महाराष्ट्रातील विविध पक्षांची नेतेमंडळी प्रचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजता वडगाव येथील मंगाई मंदिर येथून रोड शो ला प्रारंभ होईल. त्यानंतर पाटील गल्ली, कारभार गल्ली, पिंपळकट्टा, वडगाव मुख्य रस्ता, बॅ. नाथ पै चौक, शहापूर खडेबाजार, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, त्यानंतर शिवसृष्टी येथे रोड शो ची सांगता होणार आहे. त्यानंतर जाहीर सभादेखील होणार आहे. यावेळी रोहित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व कार्यकर्ते, युवक मंडळे व महिला मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदवाडी येथे उद्या पदयात्रा
रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 30 रोजी सकाळी 8 वाजता हिंदवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात येणार आहे. डाक बंगला, आनंदवाडी क्रॉस येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. राधाकृष्ण मार्ग, हिंदवाडीमधील सर्व क्रॉस, सर्वोदय कॉलनी, महावीर भवनमार्गे व•र छावणी, सराफ कॉलनी, आरपीडी क्रॉस येथील परिसरात सांगता होणार आहे.तरी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंचमंडळी, युवक मंडळे, महिला मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज चव्हाट गल्लीत सभा : य् ाsळ्ळूरकरांच्या प्रचारफेरीत होणार सहभागी
उत्तर मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारात महाराष्ट्रातील युवा आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत. तसेच शनिवार दि. 29 रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांतिसिंह नानापाटील चौक चव्हाट गल्ली या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी खडक गल्ली, भडकल गल्ली, जालगार गल्ली, शेट्टी गल्ली आणि चव्हाट गल्ली या भागात समिती उमेदवाराच्या भव्य प्रचार फेरीत आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत. खडक गल्ली येथून प्रचाराला सुऊवात होणार असून प्रचाराची जय्यत तयारी युवक मंडळांकडून करण्यात आली आहे. तरी समितीप्रेमी नागरिक, महिला मंडळे, आजी-माजी लोकप्रतिनीधी, पंचमंडळी, जेष्ठ नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रचारफेरी ठीक 6 वाजता सुरू होईल.









