वार्ताहर /जांबोटी
खानापूर विधानसभा मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या जांबोटी येथील प्रचारकार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी माजी सभापती माऊती परमेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी तालुका म. ए. समितीचे पदाधिकारी व असंख्य समिती कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जांबोटी बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार दिगंबर पाटील व जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. माजी सभापती माऊती परमेकर यांच्या हस्ते फीत कापून प्रचारकार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जय भवानी जय शिवाजी तसेच जय महाराष्ट्र आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमाला खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, प्रकाश चव्हाण, कृष्णा मन्नोळकर, माऊती गुरव, अर्जुन देसाई, निरंजन सरदेसाई, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, महादेव घाडी, रामा खांबले, प्रभाकर बिरजे, रमेश देसाई, विठ्ठल गुरव, रविंद्र शिंदे, जगन्नाथ बिरजे, गोविंद जाधव, लक्ष्मण कसर्लेकर, मऱ्याप्पा पाटील, प्रल्हाद मादार, राजू चिखलकर यांच्यासह जांबोटी-ओलमणी परिसरातील असंख्य समितीप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भागातील अनेक गावातून म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे..









