म. ए. समिती ग्रामीण उमेदवार आर. एम. चौगुले यांचे अतिवाडमध्ये प्रचारादरम्यान प्रतिपादन
बेळगाव : मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकविण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे योगदान मोठे आहे. स्वाभिमान अखंड ठेवून जनता माय मराठीच्या रक्षणासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत समितीचा उमेदवार बहुमतांनी निवडून येईल. यात तिळमात्र शंका नाही, असे उद्गार महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी काढले. शुक्रवारी सकाळी अतिवाड येथे प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी छ. शिवाजी महाराज चौकात झालेल्या सांगता कार्यक्रमात त्यांनी विचार व्यक्त केले. प्रारंभी छ. शिवाजी महाजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून प्रचाराला प्रारंभ झाला. पुढे चौगुले म्हणाले, ग्रामीणच्या उमेदवाराला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागला आहे. मराठीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केवळ म. ए. समिती सक्रिय आहे. यावेळी शिवाजी गल्ली, तानाजी गल्ली, मारुती गल्ली, ब्रह्मलिंग गल्ली, गणपत गल्ली, इंदिरानगरमार्गे निघालेल्या प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेकडो युवा तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. य् ााप्रसंगी माजी महापौर शिवाजी सुंठकर, समिती नेते मनोज पावशे, पुंडलिक पावशे, मधू बेळगावकर, ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी, विद्या पाटील, आनंद पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, संतू पाटील, केदारी पाटील, हणमंत पाटील, चाळोबा पाटील, शंकर बोकमूरकर, शोभा पाटील, अश्विनी पाटील यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.









