वार्ताहर /कडोली
य् ामकनमर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ कडोली गावात काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत नागरिकांनी सहभाग घेऊन भरघोस पाठिंबा दर्शविला. प्रत्यक्ष मतदारांना भेटून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांना मतदान करण्याची विनंती करत आहेत कडोली येथील अनेक गल्ल्यांमधून प्रचारफेरी काढण्यात आली.प्रचारफेरीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा व्यक्त केला. प्रचारफेरीत जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ग्रा. पं. अध्यक्षा रेखा सुतार, उपाध्यक्षा रेखा नगेरी, सदस्य राजू मायाण्णा, सुनील पावणोजी, दत्ता सुतार, प्रेमा नरोटी, लक्ष्मी कुंट्रे, संजू कांबळे आदी सदस्य, कार्यकर्ते, महिला सहभागी होत्या.









