वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माद्रिदमध्ये झालेल्या सरावाच्या फुटबॉल सामन्यात भारताच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या युवा फुटबॉल संघाने अॅटलेटिको डी मॅड्रिलिनो संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. स्पेनच्या दौऱ्यामध्ये भारतीय फुटबॉल संघ आणखी काही सरावाचे सामने खेळणार आहे.
येत्या जूनमध्ये थायलंड येथे होणाऱ्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी सरावाकरिता भारतीय फुटबॉल फेडरेशनने या संघासाठी स्पेनचा दौरा आयोजित केला आहे. या सरावाच्या सामन्यात भारतातर्फे टी. गंगाते आणि लालपेखलुआ यांनी भारतातर्फे सामन्याच्या उत्तरार्धात प्रत्येकी एक गोल तर अॅटलेटिकोतर्फे एकमेव टेलॉनने नोंदवला.









