लंडन
बीबीसीचे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी शासकीय नियुक्तींशी संबंधित सरकारी नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित एक अहवाल समोर आल्यावर राजीनामा दिला आहे. कॉन्झर्व्हेर्टिव्ह पार्टीचे देणगीदार रिचर्ड शार्प यांनी 2021 मध्ये तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासाठी कर्जाची व्यवस्था करण्यास मदत केली होती असे अहवालात म्हटले गेले होते. नियमांबद्दल मी अनभिज्ञ होतो आणि उल्लंघनाचा प्रकार समारे आल्यावर बीबीसीच्या हितांना प्राथमिकता देण्यासाठी राजीनामा देत असल्याचे शार्प यांनी म्हटले आहे.









