होशियारपूर
शिरोमणी अकाली दलाच्या दुहेरी घटना वादाप्रकरणी पंजाबच्या होशियारपूर न्यायालयाने पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्दबातल ठरविला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर यांनी होशियारपूर येथील न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. कुठलाच पुरावा नसल्याने गुन्हेगारी कारवाई रद्द करण्यात येत असल्याचे न्यायाधीश एम.आर. शाह यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे.









