वृत्तसंस्था/ अलास्का
प्रशिक्षणावरून परतत असलेली अमेरिकेच्या सैन्याची दोन हेलिकॉप्टर्स अलास्कामध्ये दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. या दुर्घटनांमध्ये 3 वैमानिकांना जीव गमवावा लागला आहे. प्रत्येक हेलिकॉप्टरमधून दोन जण प्रवास करत होते, अशी माहिती अमेरिकेच्या सैन्याचे प्रवक्ते जॉन पेनेल यांनी दिली आहे. प्रशिक्षण मोहिमेवरून परतत असताना मध्य अलास्कामध्ये दोन अपाचे हेलिकॉप्टर्स दुर्घटनाग्रस्त झाली होती. सैन्याने या दुर्घटनांमागील कारणांचा तपशील देण्यास नकार देत याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. मागील महिन्यात केंटुकीमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत 9 सैनिकांना जीव गमवावा लागला होता.









