राजापूर (प्रतिनिधी )
प्रस्तावित बारसू प्रकल्पावर आंदोलकांना भेटण्यासाठी चाललेले खासदार विनायक राऊत व सेनेचे अन्य पदाधिकारी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन सर्वाना राजापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
सकाळी बारसू येथील सड्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) सचीव खासदार विनायक राऊत हे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह चालले असताना पोलीसांनी त्यांना अटक करून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, खासदार राऊत यांच्या अटकेची बातमी पसरताच त्यांच्या समर्थनार्थ राजापूर पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक जमा होवु लागले आहेत. खासदार राऊत यांना नक्की कोणत्या कलमाखाली ताब्यात घेतले ते मात्र समजू शकले नाही. य़ाअगोदर गुरुवारी रात्री नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनाचे नेते अशोक वालम व त्यांचे सुपुत्र विनेश वालम यांना पोलीसांनी अटक केली होती. खासदार विनायक राउत यांच्याबोरबर सुधीर मोरे, विलास चाळके, चंद्रप्रकाश नकाशे, विद्याधर पेडणेकर, रामचंद्र सरवणकर, कमलाकर कदम यांनाही अटक करण्यात आली आहे.








