राधानगरी / प्रतिनिधी
दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातील हसणे ता, राधानगरी येथील संदीप विश्राम मुनगेकर वय 45 हा गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली वनविभागाकडून माहिती अशी की संदीप मुनगेकर हसणे या गावी हद्दीतील आपल्या शेतात जात असताना दुपारी चारच्या सुमारास अचानक गव्याने जोराचे धडक दिली या धडकेने त्याच्या डोकीला जोरात मार लागला आहे तसेच जोरात धडक बसल्याने बरगड्या व मणक्यालाही मोठ्या प्रमाणात मार लागून जखमी झाले आहेत त्याला प्राथमिक उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्याने दाखल केले संबंधित शेतकरी गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे दरम्यान मुंनगेकर याला वन्यजीव अधिनियमानुसार गव्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याने भरघोस आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या विभागाचे वनपाल एस एस मुजावर यांनी सांगितले यावेळी वनरक्षक एस व्ही काशीद सूर्यकांत सावंत , माजी सरपंच सूर्यकांत सावंत, राजेश तांबे यशवंत कांबळे, शशिकांत चाळके आदींनी ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे उपचारासाठी दाखल केले दरम्यान गव्याच्या हल्ल्यात वारंवार शेतकरी जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे वन्यजीव विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी अभयारण्यग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे,