माझ्या राजकीय जीवनामध्ये मतदार संघातील माता-भगिनींच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. यानंतरही महिला स्व सहाय संघाना विशेष सहकार करण्यात येईल असे आश्वासन कागवाड भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांनी दिला आहे.
शिरगुपी येथे गावातील महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांच्या अडीअडचणी श्रीमंत पाटील यांनी जाणून घेऊन आपले विचार मांडले.
शिरगुपी येथे यापूर्वी महिला संघटनेच्या विविध संघांना 22 लाख रुपयाचे सहाय्य केले आहे. यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सवलती तुमच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.मतदार संघात महिला मतदार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माझ्या पाच वर्षाच्या विकास कामाचा आढावा महिला मतदारांना मिळाला आहे यामुळे मी सर्वाधिक मताने विजयी होईन असा विश्वास व्यक्त केला.
शिरगुपी भाजप युवा नेते शिवानंद पाटील म्हणाले, कागवड मतदार संघाला गेल्या कित्येक वर्षानंतर विकास काम एकच ध्यास असलेल्या आमदार श्रीमंत पाटील लाभले आहेत.
कागवाड मतदार संघासाठी महाराष्ट्रातून नेमलेल्या भाजप नेत्या रूपाली कचरे आणि मीना कदम यांनी म्हणाल्या मतदारसंघाचा संपूर्ण सर्वे आपण केला असून आमदार श्रीमंत पाटील यांच्या कामावर सर्वांचा विश्वास आहे यामुळे यांचा विजय कोणीही थांबवू शकत नाही असे सांगितले.
शिरगुप्पी गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षा अपर्णा पाटील, माजी अध्यक्षा गीतांजली चौगुले, अपर्णा मोने श्रीमती कोळी यांनी श्रीमंत पाटील यांच्या विकास कामाचा आढावा घेऊन महिला मतदारांच्या वतीने पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी शिरगुप्पी येथील भाजप युवा नेते शिवानंद पाटील, भरमण्णा चौगुले, शिवानंद नवीनाळ, शिवानंद बुरली, सहदेव पुजारी, सचिन देसाई सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.