प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Market Committee Election : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या शुक्रवार 28 रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रीयेसाठी रमणमळा बहुउद्देशीय हॉल येथे आज गुरुवार 27 रोजी सकाळी 11 वाजता मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. समितीच्या चार मतदार संघासाठी 70 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानासाठी 480 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर बाजार समितीची निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. समितीच्या आठरा जागांसाठी 51 उमेदवार रिंगणार आहेत. निवडणुक बिनविरोध होण्याची चिन्हे असताना जागा वापटपावरुन सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्षाने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना सोबत घेत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची तर भाजप-शिवसेना आणि ठाकरे गटाने राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि आरपीआयचे उत्तम कांबळे यांना सोबत घेत शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडीची घोषणा केली आहे. या दोन आघाड्यांमध्ये खरी निवडणुक होणार आहे.
मतदान पथक आज दुपारी संबंधित मतदान केंद्रावर पोहोचतील. मतदान प्रक्रीयेला शुक्रवार 28 रोजी सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. विकास संस्था गटात 36 केंद्रे, ग्रामपंचायत गटात 29 केंद्रे, व्यापारी गटात तीन केंद्रे आणि हमाल तोलाई गटात एकूण दोन केंद्र अशा एकूण 70 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान संपल्यानंतर सायंकाळी रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल मध्ये स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद मतपेट्या ठेवल्या जातील. मतमोजणीला रविवार 30 रोजी सकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









