नवी दिल्ली
टू-व्हीलर प्रमुख बजाज ऑटोचा करानंतरचा नफा (पीएटी) 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत 2 टक्क्यांनी घसरून 1,433 कोटी रुपये झाला, तर महसूल वार्षिक 12 टक्क्यांनी वाढून 8,905 कोटी रुपयावर पोहोचला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी, कंपनीचा महसूल हा 10 टक्क्यांनी वाढून 36,428 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पुरवठा मर्यादा आणि परदेशी बाजारपेठेतील आव्हाने कंपनीला झेलावी लागली आहेत. कंपनीच्या एकूण निर्यातीत 41 टक्क्यांनी घट झाली आहे.
चौथ्या तिमाहीत महसुलातील वाढ देशांतर्गत व्यवसायामुळे झाली. हे 50 टक्क्यांहून अधिक योगदान राहिले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, चांगले परकीय चलन, चांगली किंमत आणि चांगले उत्पादन यामुळे महसूल वाढण्यास मदत झाली आहे.
टाटाच्या नफ्यात वाढ
टाटा कन्झुमर उत्पादनांचा निव्वळ नफा मार्च तिमाहीत 23.5 टक्क्यांनी वाढून 268.6 कोटी रुपयांवर पोहोचला. या कालावधीत कंपनीचा महसूल 14 टक्क्यांनी वाढून 3,618.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, ज्याला भारतीय व्यवसायात 15 टक्के, आंतरराष्ट्रीय व्यवसायात 6 टक्के आणि नॉन-ब्रँडेड व्यवसायातील 9 टक्के वाढीमुळे समर्थन मिळाले आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डिसूजा म्हणाले, “या तिमाहीत आम्हाला ब्रँडेड चहाच्या व्यवसायात सुधारणा होण्याची चिन्हे दिसली. ते म्हणाले, आम्ही मीठासारख्या आमच्या इतर मुख्य व्यवसायाची गुणवत्ता तर वाढवलीच तर आमचा बाजारहिस्साही वाढवला आहे, तर महागाई लक्षात घेता आम्ही किमतीतही वाढ केली असल्याचेही ते म्हणाले आहेत.









