कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील मिरज रोडवरील महादेव मंदिरासमोर फ्लॅटमध्ये भाडयाने राहणाऱ्या डॉ.अनिल बाबाजी शिंदे (वय ४३,मूळ गाव वडगांव ता.तासगाव जि सांगली) यांचा सख्ख्या लहान भावाने धारदार विळ्याच्या सहाय्याने सपासप वार करून खुन केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
प्रथमदर्शनी हा खुन कौटुंबिक वादातून नैराश्येपोटी चिडून खुन केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. खुन करून पळून जाऊन बहिणीच्या घरात लपलेल्या संशयित संपत बाबाजी शिंदे (वय ३५, रा.शिवशक्तीनगर, कुपवाड, मुळगांव वडगांव ता.तासगाव जि सांगली) याला कुपवाड पोलिसांनी अवघ्या तासातच गजाआड़ केले. मृताची पत्नी सरस्वती अनिल शिंदे यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मृत डॉ.अनिल शिंदे घरात ज्ञानेश्वरी वाचन करीत होते तर त्यांची पत्नी सरस्वती व दोन लहान मुले नाष्टा करत बसले होते. यावेळी अचानक संशयित संपतने दरवाजाला जोरात धक्का मारून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. ‘अन्या कुठं आहे ? असा जोरात ओरडत खोलीत जावून डॉक्टरवर थेट धारदार विळ्याने सपासप वार केले. यावेळी पत्नी सरस्वती या भितीने आरडाओरडा करत आपल्या ओम व साई या दोन्ही लहान मुलांना घेऊन फ्लॅटबाहेर पडल्या. महिलेचा आरडाओरडा ऐकून बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच कुपवाडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हलेखोराची माहिती घेवून काही तासाच संशयित आरोपीला अटक केली. त्याने हल्ल्यात वापरलेला विळाही पोलिसांनी जप्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









