गोकुळ शिरगाव वार्ताहर
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती मधील उद्योग दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, याच गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीच्या धरतीवर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा विस्तार वाढत आहे, पूर्वी छोटे छोटे असले कारखाने आज मोठे रूप धारण करत आहेत. कारखाने मोठे होतील तसे व कामाची व्याप्ती वाढत राहिल्याने मोठ्या उद्योजकांनी आपल्या कंपनीतील काम बाहेर देण्यास सुरुवात केली .यातूनच गोकुळ शिरगाव मध्ये छोटी औद्योगिक वसाहत उदयास आली . त्यांना सुद्धा कामाचा व्याप जोरदार वाढू लागला पण हे होत असताना आता मात्र आता या छोट्या उद्योजकांना मोठ्या उद्योजकांच्याकडून आर्थिक व इतर मागण्यांसाठी त्रास होत आहे असे मत इथले छोटे उद्योजक सांगत आहेत.
गोकुळ शिरगाव येथे जवळपास 400 ते 500 उद्योजकांनी एकत्र येत संपूर्ण गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये आपल्या न्याय व हक्कासाठी गोकुळ शिरगाव एम आय डी सी त मोर्चाद्वारे निषेध फेरी काढत विविध मागण्यासाठी शासनाचे व मोठ्या उद्योजकांचे लक्ष्य वेदन्यासाठी मंगळवार दिनांक 25 रोजी दुपारी भर उन्हात या छोट्या उद्योजकांनी आज मोटरसायकल रॅली काढली.
न्याय व हक्कासाठी इंजिनीअरिंग कॉम्पोनन्ट्स मशीनिंग ओनर्स वेलफेअर (ECMOW)असोसिएशन, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील लघु व सुक्ष्म उद्योजकांनी गोकुळ शिरगाव एम.आय. डी .सी परिसरात विविध मागण्यासाठी काम बंद ठेऊन आंदोलन केले.या वेळी भव्य मोटर सायकल रॅली काढून मोठ्या उद्योजकांकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लघू उद्योजक व कामगार यांनी काढलेला कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच मोर्चा असल्यानं विविध मागण्याची पूर्तता होण्यासाठी उद्योजकांनी विवीध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
येथे झालेल्या आंदोलनात लघु व सुक्ष्म उद्योजकांनी विविध मागण्याच्या माध्यमातून मोठ्या उद्योजकांचे व महाराष्ट्र शासनाचे लक्ष्य वेधले आहे.
या मध्ये बोरिंग रिटर्न पॉलिसी बंद झाली पाहिजे.दर वर्षी महागाई प्रमाणे मशिनिंग दर वाढले पाहिजे.मशीनचे तासी दर योग्य मिळालेच पाहिजेत्.कामचे बिल ४५ दिवसात जी एस टी नियमानुसार वेळेत मिळाले पाहिजे.लघु उद्योजकांचे शोषण बंद झाले पाहिजे.बेकादेशीर डेबिट नोट बंद झाली पाहिजे.लहान उद्योजकांना न्याय मिळाला पाहिजे.अश्या या वेळी मागण्या करण्यात आल्या. या मागणीचे निवेदन गोशिमा कार्यालय, उद्योग मंत्री, उद्योजक कार्यालय व इतर मोठे कारखानदार यांना देण्यात आले आहे. या वेळी लघु उद्योजक यानी विविध घोषणा देउन परिसर दणाणून सोडला होता. भर उन्हातून सकाळीं दहा वाजता सुरु झालेला हा मोर्चा तीन वाजे पर्यंत सरूच होता.
या आंदोलनावेळी अध्यक्ष राजीव आवटे, उपाध्यक्ष विजय दाभाडे, सेक्रेटरी नयन गारगोटे, खाजानिस सतीश पाटील, संचालक मोहन शेटे, संदिप कदम, संतोष वठारे, अमितकुमार पाटील, विजय शिंदे, लघु उद्योजक गणेश पवार, रवी ढोकरे , नवनाथ पाटील, कृष्णात चव्हाण, मयूर जगताप, अभिजित नरके, कामगार प्रतिनिधी उदय खराडे, बाळासो पाटील यांच्या सह साडेतीनशे लघु व सुक्ष्म उदोजक आंदोलनात काम बंद ठेऊन सहभागी झाले होते.