साळगाव येथे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही

म्हापसा : स्वत:च्या जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामाला अर्ज करूनही घरक्रमांक मिळाला नसल्यास अशा प्रकारची कोणतीही बांधकामे आता घर क्रमांकाविना प्रलंबित ठेवली जाणार नाहीत, ती त्वरित नियमित केली जाईल. त्यासाठी कोणीही ‘भिवपाची गरज ना’ अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साळगाव येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा, सुशासन व जनकल्याण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यांचे निवारण केले. आमदार केदार नाईक, साळगावचे सरपंच लुकास रेमेडिओस, पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर, उपजिल्हाधिकारी यशस्विनी बी., उपजिल्हाधिकारी गुऊदास देसाई व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालविला.
‘लाडली लक्ष्मी’चे प्रलंबित अर्ज तीन महिन्यात निकाली काढणार
विवाह झालेल्या सर्व लाडलींचे एक लाख ऊपये अर्थसाहाय्याचे अर्ज येत्या तीन महिन्यात निकालात काढले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. कार्यक्रमात एका विवाहितेने गेली पाच वर्षे आपल्याला लाडली लक्ष्मीचे अर्थसहाय्य मिळालेले नाही, याकडे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, विवाहित लाडलींचे प्रलंबित अर्ज 31 मार्चपर्यंत निकालात काढण्याचे आदेश आपण महिला बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते. तरीही अजून जर अर्ज प्रलंबित असतील तर येत्या तीन महिन्यात निकालात काढू, असे मुख्यमंत्र्यांनी किशोरी कांदोळकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
दोन वर्षे मिळत नाही ‘गृह आधार’चे अर्थसहाय्य
राधिका परीथ यांनी “आपला नवरा खासगी नोकरी करत असून त्याला अल्प वेतन मिळते. अशा परिस्थितीत आपले ‘गृह आधार’चे अर्थसहाय्य बंद करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे आपल्याला अर्थसहाय्य मिळत नाही”, अशी कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आमदार केदार नाईक यांच्या कार्यालयात अर्ज देण्यास सांगितले.
लवकरच करणार कंत्राटी दंत चिकित्सकांची भरती
सूर्या पेडणेकर म्हणाले, 2026 मध्ये साळगाव आरोग्य केंद्र सुरू केले. मात्र नोंदणी केंद्रावर व्यक्ती नाही. त्याचप्रमाणे दंत विभागात डॉक्टरांचा अभाव आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुळातच दंत चिकित्सकांची संख्या कमी आहे. त्यामुळे आळीपाळीने दंतचिकित्सक हे सर्व आरोग्य केंद्रात भेट देताहेत. अशावेळी कंत्राटी पद्धतीवर लवकरच नवीन दंतचिकित्सक घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.
जमिनीची एनओसी मिळाल्यानंतर साळगावात त्वरित फुटबॉल मैदान
साळगांवमध्ये अनेक उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत. त्यामुळे गावात पायाभूत सुविधांसह फुटबॉल मैदान असावे, अशी मागणी डेंझिल फ्रॅन्को यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, गावात सुधारित आरोग्य पायाभूत सुविधा व क्रीडा या दोन गोष्टींना स्थानिक आमदार केदार नाईक प्राधान्य देण्यासह पाठपुरावाही करताहेत. फुटबॉल मैदानाच्या जागेसंबंधी एनओसी मिळाल्यानंतर लगेच काम सुऊ करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्र् ााr शर्वाणी देवळाजवळील महत्वाच्या पायवाटेचा रस्ता करु
गावातील श्री शर्वाणी देवळाजवळ पायवाट आहे, तिथे रस्ता करून द्यावा, अशी मागणी तुकाराम पायाजी यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तेथे पालखी जाते. जमिनीसाठी नाहरकत दाखला मिळाला असता तर एवढ्यात रस्ता झाला असता. सर्वांनी पारंपरिक वाटेला नाहरकत दाखला द्यावा, लगेच रस्ता करुन देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोमुनिदाद जमिनीत शेतीसाठी विहीर खोदण्यास परवानगी देऊ
कोमुनिदादच्या जागेत शेतकऱ्यांना विहिरी बांधण्यास दिले जात नाही. यातून आम्ही कशी वाट काढू शकतो, असे एश्ली डिसोझा यांनी विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, कोमुनिदादचे शेतकरी असल्यास त्यांची सोय करू. मात्र त्या विहिरी बिल्डींग वा टँकरद्वारे पाणी नेण्यासाठी असता कामा नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतीसाठी विहीर बांधण्यास परवानगी देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. रजत कुडणेकर यांनी बांध दुऊस्त करावेत अशी मागणी केली. त्याला सर्व शेतकरी तयार असल्यास आरडीएमार्फत ते करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साळगावात मधलेभाट येथील रस्ता पावसापूर्वी होणार असे मुख्यमंत्र्यांनी नाझारेथ डिसोझा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी पेट्रिक लोबो यांनी साळगावात वाहतूक खोळंबा होत असल्याचे सांगितले. पीडबल्यूडीचे अभियंता स्थळ निरीक्षण करण्यासाठी जाताना आपणास नेण्यासाठी लोकांना गाड्या घेऊन येण्यास र्सींगतात, असेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी पंचायती व नगरपालिकांशी आभासी पद्धतीने संवाद साधला. तसेच लोकसेवेच्या उद्देशाने आयोजित आजच्या कार्यक्रमांसाठी त्यांच्या सहभागाचे कौतुक केले.
अनेक लोकांनी मांडली गाऱ्हाणी
मुख्यमंत्र्यांनी यापुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकारी वाहनांतून पाहणीला जावे, असे निर्देश दिले. लाडली लक्ष्मी, गृह आधार या योजना सुरळीत चालू ठेवण्यास सांगितले. साळगाव आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यात येतील आणि गावात फुटबॉल मैदान उभारण्यात येईल, अशी आश्वासने मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना यावेळी दिली.









