रविवारी झालेल्या प्रचारफेरीत नागरिकांचा एकमुखी पाठिंबा : समितीच्या बालेकिल्ल्यात घेतला ज्येष्ठांचा आशीर्वाद
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
बेळगाव ग्रामीणचे तालुका म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची रविवारी कंग्राळी बुद्रुक भागात झंझावाती प्रचारफेरी काढण्यात आली. या भागातील समिती कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आपला एकमुखी पाठिंबा दर्शविला असून चौगुले यांना भरघोस मतांनी विजयी करून विधानसभेवर पाठविण्याचा निर्धार करण्यात आला. कंग्राळी बुद्रुक गाव समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. यापूर्वीही या गावाने समितीला भरघोस मतदान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सध्या मराठी भाषिकांमध्ये पोषक वातावरण आहे. सीमाप्रश्न कोर्टामध्ये अंतिम टप्प्यात असून तो सोडवण्यासाठी आर. एम. चौगुलेंना विधानसभेवर पाठवणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
चौगुले यांचे औक्षण करून स्वागत
रविवारी सायंकाळी 6 वा. प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. गावात आर. एम. चौगुले यांचे आगमन होताच प्रवेशद्वारावर भरमदेवाचे पूजन चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीनिष्ठ कार्यकर्ते अरुण पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती कागणकर, महादेव पाटील यांच्या हस्ते हार घालून व औक्षण करून स्वागत करण्यात आले. गावच्या मध्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन उमेदवार चौगुलेंच्या हस्ते करून प्रचारफेरीला प्रारंभ करण्यात आला. प्रचारफेरी बाहेर गल्ली, मराठा कॉलनी, रामनगर, शास्त्रीनगर, संताजी गल्ली, पाटील गल्ली, आंबेडकर गल्ली, मरगाईनगर, मसणाई गल्ली, चव्हाट गल्ली, कलमेश्वर गल्ली, नेताजी गल्ली, लक्ष्मी गल्ली आदी गल्ल्यांतून काढून घरोघरी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला.
निवडून आणण्याचा निर्धार
गावचे जागृत देवस्थान श्री कलमेश्वर व मरगाईचे आर. एम. चौगुलेंच्या हस्ते पूजन करून आशीर्वाद घेण्यात आला. प्रचारफेरीत प्रत्येक गल्लीत सुवासिनींनी उमेदवार चौगुलेंचे आरती ओवाळून औक्षण करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. प्रचारफेरी गावभर फिरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यावर बोलताना चौगुले म्हणाले, या गावातील समिती कार्यकर्त्यांचा प्रचारफेरीमधील मोठा सहभाग पाहता माझा विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी असेच माझ्या पाठीशी राहून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, ग्रा.पं. व ग्रामस्थांच्यावतीने पाठिंबा व्यक्त केला. अमोल पाटील, शंकर पाटील, शंकर कोनेरी, सदानंद चव्हाण यांनी पाठिंबा व्यक्त केला. शंकर कोनेरी यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद चव्हाण यांनी आभार मानले. प्रचारफेरीत अॅड. सुधीर चव्हाण, मल्लाप्पा पाटील, रवी चव्हाण, यल्लोजी पाटील, वाय. बी. चव्हाण, शंकर चव्हाण, किसन हुरुडे, सुभाष चिखलकर, गणपत कोनेरी, प्रदीप कडोलकर, रमेश पाटील, अमोल पाटील, मिनाजी पाटील, मोहन भैरटकर, मोहन मोरे, नागराज हुरुडे, प्रभाकर पाटील, सचिन चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, मयूर बसरीकट्टी, शिवा कोळी, किरण कोळी, मदन पवार, अरुण पाटील, नवनाथ पुजारी, सुनील पाटील, युवराज पाटील, बालाजी चव्हाण, संजय कडोलकर, संजय कोलते, प्रशांत पवार, मारुती पाटील, कार्तिक चिखलकर, आनंद पाटील, गजानन अष्टेकर, महेश अष्टेकर, नागेश धामणेकर, अनिल कडोलकर, जयराम पावशे, लक्ष्मण हुरुडे, कल्लाप्पा हुरुडे, गोपाळ पाटील, परशराम निलजकर, महेश निलजकरसह विविध युवक मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामीण मतदार संघातील समितीनिष्ठ आजी-माजी लोकप्रतिनिधी व महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









