पुणे / प्रतिनिधी :
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज असून, यातील काही भागांत गारपिटीचा इशाराही हवामान विभागाने सोमवारी दिला. यामुळे शेतकरी पुन्हा धास्तावला आहे.
मध्य प्रदेश व तामिळनाडूच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती आहे. या स्थितीदरम्यान वाऱ्याची अखंडितता देखील आहे. याच्या प्रभावामुळे काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातील काही जिल्हय़ांत पुढील पाच दिवस तुरळक पावसाचा अंदाज असून, त्यात 25 ते 27 एप्रिलदरम्यान काही भागात गारपिटीचा इशारा आहे.
दरम्यान, देशातील उष्णतेची लाट ओसरली असून, कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदविण्यात आले आहे. महाराष्ट्रातही कोकण गोव्यात उन्हाळा कडक आहे. अवकाळी पावसामुळे दुपारनंतर कमाल तापमान कमी राहण्याची चिन्हे आहेत.








