तरुण भारत वृत्ताची दखल : भाविक-नागरिकांतून समाधान

वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील मळेकरणी देवस्थानकडे ये-जा करणाऱ्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘तरुण भारत’मधून अनेकवेळा रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने करण्यात यावे, यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. याची दखल घेऊन सोमवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. परिणामी भाविक आणि नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उचगाव येथील मळेकरणी देवस्थान एक जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानमध्ये हजारो भाविक मंगळवार, शुक्रवार यात्रेसाठी येत असतात. येत्या दोन महिन्यात यात्रा करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. मात्र या देवस्थानकडे ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग पक्का करण्यासाठी म्हणून सदर ठेकेदाराने रस्ता खणून रोलर फिरवून यावर खडी पसरवली होती. भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी ‘तरुण भारत’मधून अशाप्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून अनेकवेळा ग्रामस्थांच्या तक्रारी या ठेकेदारांसमोर मांडण्यात आल्या होत्या. याचीच दखल तातडीने घेऊन या रस्त्याच्या खडीकरणास त्यांनी प्रारंभ केल्याने ग्रामस्थ व भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदर मार्ग हा उचगाव, कोनेवाडी, तुरमुरी या रस्त्याला जोडणारा जोड रस्ता आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांची शेती मळेकरणी देवीच्या आमराईच्या मागील बाजूला असून या शेतवडीत जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. य् ाा रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्याने उचगाव ग्रामस्थ, भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला. यावेळी सदस्य एल. डी. चौगुले, ग्रामपंचायत माजी सदस्य मनोहर कदम, भास्कर कदम, वामन कदम, माजी अध्यक्ष मुराद ताशीलदार, विनायक कदम व ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होत
दोन आठवडे रस्ता राहणार बंद
सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात आल्याने मळेकरणी देवस्थानकडे ये-जा करण्यासाठी दोन आठवडे हा मार्ग बंद ठेवला आहे. मळेकरणीच्या आमराईत जाण्यासाठी दुसऱ्या रस्त्याची तात्पुरती व्यवस्था ग्रामपंचायतने केली आहे. तरी याची नोंद सर्व ग्रामस्थांनी आणि भाविकांनी घ्यावी. रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पक्के होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.









