सावंतवाडी / प्रतिनिधी
Double success of Swarali Satha of Nemale High School!
निमिष राऊळ ठरला ब्रॉंझ मेडल चा मानकरी
अनेक स्पर्धांमध्ये जिल्ह्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या नेमळे हायस्कुलचा यशाचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे ,
गणित अध्यापक मंडळ सिंधुदुर्ग मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत नेमळे हायस्कुलची विद्यार्थिनी कुमारी स्वराली साठे 100 पैकी 87 गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. तसेच कुमारी जान्हवी हेमंत राऊळ हिला 67 गुण मिळाले.दोन्ही विद्यार्थ्यांना श्री नितिन धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये देखील प्रशालेने घवघवीत यश संपादन केले प्रशालेतून 6 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते,त्यापैकी 2 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले,कुमारी स्वराली विनायक साठे या विदयार्थीनीने 172 मार्क्स मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले.स्वरालीच्या या उत्तुंग यशामध्ये तिच्या आई वडिलांचा खूप मोलाचा वाटा आहे. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च मध्ये कुमार निमिष उमेश राऊळ या विद्यार्थ्याला ब्रॉंझ मेडल मिळाले प्रशालेतून यज्ञेश युवराज शिंदे,पूर्वा उमेश लाड,तनिषा मुकुंद आंबेरकर हे विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झाले होते,या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री उमेश राऊळ व श्री नितीन धामापूरकर यांचे मार्गर्शन लाभले, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ कल्पना बोवलेकर मॅडम ,संस्थाध्यक्ष श्री आ.भि.राऊळ सर,श्री राठोड सर यांनी अभिनंदन केले.









