ओटवणे / प्रतिनिधी
साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे आयोजन
श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने दाणोली येथील बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय आणि माडखोल माध्यमिक विद्यालय तसेच दाणोली बाजार प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेमसावंत भोसले आणि सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम सावंत भोसले यांच्याहस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयातून दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मनाली मनोहर सावंत, भक्ती राजकुमार खटावकर, सुप्रिया महेश पाटील या विद्यार्थिनींचा तसेच दाणोली बाजार शाळेतील देवांक मनोहर मालवणकर, सानवी नितीन धुरी, मनस्वी अंकुश भिंगारे, तसेच साटम महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माडखोल माध्यमिक विद्यालयातून दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या प्रांजली बाबू परब, सिद्धी काढू बरागडे, विणा संतोष सावंत या विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेत माडखोल केंद्र शाळेच्या दिनेश कृष्णा राऊळ या विद्यार्थ्याने २२२ गुणासह सावंतवाडी तालुक्यात प्रथम तर जिल्हयात पाचवा क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड शामराव सावंत, काका मांजरेकर सावंत, एल एम सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एस तिळवे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर जी पाटील यांनी केले.