ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-बेंगळूर महामार्गावर पुण्यातील नवले पुलानजिक ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी आहेत. प्रवाशी गाढ झोपेत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस कोल्हापूरहून मुंबईकडे जात होती. पुणे-बेंगळूर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढत ससून रुग्णालयात दाखल केले. तसेच 4 मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.









