प्रतिनिधी, अर्चना बनगे Rajaram SugarFactory Election 2023 : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर केंद्रावर बंदी आदेश लागू केला आहे. 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.आज सकाळपासूनच तालुक्यात चुरशीने मतदान सुरु आहे. राजाराम कारखान्यासाठी सकाळी दहा वाजेपर्यंत 4906 इतके मतदान झाले तर एकूण 36.24 टक्के मतदान झाले. दुपारी बारा पर्यंत हा आकडा 68.76 टक्यापर्यंत पोहचला. निगवे दुमाला येथील मतदान केंद्रावर एकूण 276 मतदानापैकी 190 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी एकूण मतदान 69 टक्के झाले. संस्था गटातील 129 पैकी 64 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर राधानगरी मतदान केंद्रावर दुपारी 12 पर्यत 285 पैकी 201 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी आतापर्यंत राधानगरीत 72 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील या रणधुमाळीचा थोडक्यात आढावा घेऊयात या छायाचित्राच्या माध्यमातून...
छायाचित्र सहकार्य– सोशल मीडिया प्रतिनिधी राहुल गडकर, कॅमेरामन सुरज पाटील, वितरण प्रमुख सचिन बरगे, कोल्हापूर प्रतिनिधी धिरज बरगे, करवीर प्रतिनिधी जालंधर पाटील, राधानगरी प्रतिनिधी महेश तिरवडे, शाहूवाडी प्रतिनिधी संतोष कुंभार, हातकणंगले प्रतिनिधी भाऊदास गायकवाड, पुलाची शिरोली वार्ताहर सुरेश पाटील आदी.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली.आमदार सतेज पाटील यांनी सेंट झेवियर्स मतदान केंद्रावर भेट दिली.यावेळी सतेज पाटील गटाकडून बुथवर अंगठी चिन्हाचा वापर करण्यात आला. मात्र, महाडिक गटाने आक्षेप घेतल्यानंतर बुथला लावलेले अंगठी चिन्ह सतेज पाटील गटानं काढून टाकले. एकाच मतदान केंद्रावर सतेज पाटील गटाकडून बूथ लावण्यात आले.मतदान प्रक्रियेसाठी 58 केंद्रावर 580 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मतदान केंद्र परिसरात अप्पर जिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी आदेश लागू केला आहे.माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सेंट झेव्हीयर्स मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. महादेवराव महाडिक हे जिल्ह्याचे जादूगार आहेत निकाल सांगण्याची गरज नाही. छत्रपती राजाराम कारखान्याची निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास महाडिक गटाने व्यक्त केला.संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. याठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला. कोल्हापूर शहरामध्येही दोन केंद्रांवर मतदान होत असून त्यातील संस्था गटातील मतदानासाठी सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये आमदार सतेज पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले.यावेळी मतदारांनी कोल्हापूरी फेटा बांधून उत्साहात मतदान केले.छ.राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी अतंत्य चुरशीच्या आणि ईर्षेच्या वातावरणात सकाळी साडे दहापर्यंत 50 टक्के राधानगरी येथील मतदान केंद्रावर नोंदलेले आहे. 285 पैकी 140 मतदारानी आपला हक्क बजावला. या मतदान केंद्रावर राधानगरी सह फेजीवडे, पडळी, पिरळ, सावर्धन, सोन्याची शिरोली या गावाचा समावेश आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ‘कडवे येथील मतदान केंद्रावर दोन्ही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे .मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय केली आहे . तर प्रवेशद्वारावर स्वागतासाठी दोन्ही आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते थांबवून आहेत. अत्यंत चुरशीन सुरू असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शाहूवाडी तालुक्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे .छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना बावडासाठी हातकणंगले तालुक्यातील खोची येथे सकाळी बारा वाजेपर्यंत 160 मतदानापैकी 121 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खोची येथे 105 वय असलेल्या बापू आप्पाजी मगदूम यांनी मतदानाचा हक्क बजावला.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी शिये येथे मतदानाचा हक्क बजावला. पुलाची शिरोलीत एकूण ९६४ मतदार आहेत. त्यापैकी अकरा वाजेपर्यंत ५७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. यानंतर गटाच्या कार्यकर्त्यांसोबत मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी जात असतानाचे छायाचित्र.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी पुलाची शिरोलीत दुपारी बारा वाजेपर्यंत ६८ टक्के इतके मतदान झाले. मतदान केंद्रावर महादेवराव महाडिक यांनी मतदारांशी संवाद साधला.राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या “आमचं ठरलंय, कंडका पाडायचा ,उसाला दर मिळवायचा” या टॅगलाईनने प्रचारात रंगत आणली. सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट टुर्नामेंटवेळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्या दरम्यान “कंडका पाडायचा” हा बोर्ड झळकला.मुंबई इंडियन्सचा फॅन असलेल्या सिद्धेश मोरे या वडणगेच्या युवकाने हा बोर्ड झळकावून सर्वांचे लक्ष वेधले .वडणगे (तालुका करवीर) येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्हील चेअर वरून येताना जेष्ठ मतदार .
Tarun Bharat is a Marathi newspaper based in Belagavi, India. It is the seventh-largest-selling Marathi daily newspaper in the country. The paper has eight editions from locations in North Karnataka Southern Maharashtra Konkan, Mumbai and Goa. Baburao Thakur founded the newspaper 1919 during the British colonial era.