चुये / प्रतिनिधी
Rajaram SugarFactory Election : छ. राजाराम साखर कारखाना निवडणुकीसाठी अतंत्य चुरशीच्या आणि ईर्षेच्या वातावरणात सकाळी दहा पर्यंत 20 टक्के मतदान करवीर तालुक्यातील मतदान केंद्रावर नोंदलेले आहे .
दिवसभर मोठया प्रमाणात उष्णतेचे वातावरण असते त्या कडक उन्हाचा त्रास सर्वाना सोसावा लागतो त्यामुळे उन्हाच्या झळा आणि त्रास होऊ नये म्हणून सकाळी आठ पासुन मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली. पहिल्या दोन तासात इर्षेच्या वातावरणात 20 टक्के मतदान नोंदवले आहे . सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या समर्थकांनी मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी केल्याचे चित्र करवीर तालुक्यातील मतदान केंद्रावर सकाळी दहा पर्यंत पहायला मिळत होते .









